आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ड्वेन ब्रावोबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?

विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 35 वर्षीय ब्रोवोने विंडीजकडून 270 सामने खेळले आहेत. यात त्याने 6310 धावा आणि 337 विकेट्स घेतल्या आहेत.

अशा या विंडीजच्या अष्टपैलू ड्वेन ब्रावोबद्दल खास गोष्टी

– 7 आॅक्टोबर 1983 मध्ये जन्म झालेल्या ड्वेन ब्रावोचे बालपण त्रिनीदाद या बेटावरील सांताकृज येथे गेले.

-लहानपणापासून तो फुटबॉल आणि बीच क्रिकेट खेळत असे.

-ब्रायन लारामुळे त्याला मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.

– ब्रावोने 18 एप्रिल 2004 मध्ये इंग्लंड विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याने लगेचच इंग्लंड विरुद्धच कसोटी पदार्पण केले. या कसोटी पदार्पणाच्या मालिकेत त्याने 16 विकेट्स घेतल्या होत्या.

– वयाच्या 24 वर्षाच्या आधी कसोटी आणि वनडेत नेतृत्व करणारा ब्रावो पहिला विंडीजचा खेळाडू ठरला होता. त्यानंतर 2013 मध्ये त्याला डॅरेन सॅमीच्या ऐवजी विंडीज संघाचा नियमित कर्णधार करण्यात आले.

-ब्रावोने 2014 च्या टी20 क्रिकेट विश्वचषकावेळी त्याच्या जर्सीचा 47 हा क्रमांक बदलून 3 असा केला. कारण ब्रावोच्या मुलाचा 3 आॅक्टोबरला आणि मुलीचा 3 आॅगस्टला वाढदिवस असतो. तसेच त्याच्या आईचा वाढदिवसही 3 तारखेलाच असतो.

– ब्रावोला क्रिकेटप्रमाणेच संगीतामध्येही रस आहे. त्याची गाणी लोकप्रिय झाली आहे.

-2008 मध्ये ब्रावोने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळायला सुरुवात केली. नंतर तो चेन्नई सुपर किंग्जकडून क्रिकेट खेळला.

– ब्रावोने लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘उला’ या तमिळ चित्रपटात कामही केले असून त्याने एका गाण्यावर डान्स केला आहे. तसेच या गाण्याच्या शेवटी त्याचा आवाजही दिला आहे.

– 2008 चे आयपीएल आणि विंडीज आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक यांच्यातील काही तारखेमध्ये साम्य असल्याने ब्रावोसमोर मोठा प्रश्न उभा होता. पण मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी त्याच्यासाठी जमैकापर्यंत प्रायवेट जेटची सुविधा केली. ज्यामुळे तो वेळेत कसोटी मालिकेसाठी पोहोचला.

– ब्रावोचा लहान भाऊ डॅरेन ब्रावोही क्रिकेट खेळतो. तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यात हे दोघे एकत्र खेळले आहेत.

-कारकिर्दीत यश मिळत असले तरी ब्रावो काही वादात आडकला होता. 2014 च्या भारत दौऱ्यावेळी विंडीजच्या खेळाडूंनी त्यांच्या बोर्डाविरुद्ध केलेल्या आंदोलनावेळी ब्रावोने संघातील खेळाडूंचे प्रतिनिधित्व केले होते आणि विंडीजचा संघ तो भारत दौरा अर्धवट सोडून परतले होते. ज्यामुळे त्याला 2015 च्या विश्वचषकावेळी विंडीज संघातून वगळण्यात आले होते.

त्यानंतर त्याने 31 जानेवारी 2015ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने 2010 मध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

आयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले

निवृत्तीच्या दिवशीच ड्वेन ब्रावो सापडला मोठ्या वादात

उर्वरित वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन मोठे बदल

क्रिकेट इतिहासातील सर्वात दिग्गज कर्णधाराचे विक्रम विराटने किरकोळीत मोडले