ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, इक्यू टेक्नॉंलॉजीक संघांचे विजय 

पुणे: ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत  सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, इक्यू टेक्नॉंलॉजीक   या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात  विराज काकडे याच्या नाबाद ५१धावांच्या खेळीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने अॅमेझॉन संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाच्या श्रीकांत कासार ३-१२, अभिजित जगताप २-१४, स्वप्नील चिखले २-१७)यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे अॅमेझॉन संघाचा डाव १२षटकात ९१धावावर संपुष्टात आला. यात नरेंद्र देसाई १५, उमेर अहमद १०यांनी थोडासा प्रतिकार केला. सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने हे आव्हान ८.५ षटकात १बाद ९५धावा करून  केले.  विराज काकडेने नाबाद ५१धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उंचलला. विराजला निखिल भुजबळने नाबाद २९ धावा करून साथ दिली. सामन्याचा मानकरी विराज काकडे ठरला. 

दुसऱ्या सामन्यात अभिजित आव्हाड(४-१५)याने भेदक गोलंदाजीच्या जोरावर इक्यू टेक्नॉंलॉजीक संघाने एएफके ३६धावांनी विजय मिळवला.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

 अॅमेझॉन: १२षटकात सर्वबाद ९१धावा(नरेंद्र देसाई १५, उमेर अहमद १०, श्रीकांत कासार ३-१२, अभिजित जगताप २-१४, स्वप्नील चिखले २-१७)पराभूत वि. सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: ८.५ षटकात १बाद ९५धावा(विराज काकडे नाबाद ५१, निखिल भुजबळ नाबाद २९, उमर पिरजादा १-३४);सामनावीर-विराज काकडे;

इक्यू टेक्नॉंलॉजीक: २०षटकात ८बाद १५३धावा(ज्ञानेश्वर राठोड ४९, विकास हेमानी २५, दर्शन शाह ३४, आकाश बडगुजर १७, अजय कोकाटे ३-२८, मयूर दळवी १-४, विकास जगदाळे १-२०) वि.वि.एएफके: २०षटकात ८बाद ११७धावा(विकास जगदाळे २७, प्रशांत डांगे नाबाद २९, प्रतीक रोकडे १९, अभिजित आव्हाड ४-१५, अमर गजभीये २-१८);सामनावीर-अभिजित आव्हाड.