ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत इक्यू टेक्नॉंलॉजीक संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे। 2019- ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत इक्यू टेक्नॉंलॉजीक संघाने पिल्सनर्स संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ज्ञानेश्वर राठोडच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर इक्यू टेक्नॉंलॉजीक संघाने पिल्सनर्स संघाचा 22 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना इक्यू टेक्नॉंलॉजीक संघाने 20 षटकात 5बाद 170धावा केल्या. यात ज्ञानेश्वर राठोडने 4चौकार व 5षटकारांसह केवळ 32 चेंडूत 64 धावा करून संघाचा डाव बळकट केला.

170 धावांच्या आव्हानाचे रक्षण करताना दर्शन शहा, जुनेद सय्यद, अभिजित आव्हाड व गणेश चांदगुडे यांच्या अचूक गोलंदाजीने पिल्सनर्स संघाचा डाव 20 षटकात 7बाद 148धावांत रोखला. 32 चेंडूत 64 धावा करणारा ज्ञानेश्वर राठोड सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

साखळी फेरी:
इक्यू टेक्नॉंलॉजीक: 20 षटकात 5बाद 170धावा(ज्ञानेश्वर राठोड 64(32,4चौकार, 5षटकार), सौरभ क्षत्रिय 39(34,5चौकार), विकास हेमनानी 27(26), जुनेद सय्यद नाबाद 15, सुदीप पाठक 2-28, स्वप्निल कुलकर्णी 2-33)वि.वि.पिल्सनर्स: 20 षटकात 7बाद 148धावा(स्वप्निल कुलकर्णी 44(33,5चौकार, 2षटकार), कुलदीप नायडू नाबाद 39(32,5चौकार), सागर घारु 21(16), दर्शन शहा 1-11, जुनेद सय्यद 1-15, अभिजित आव्हाड 1-17, गणेश चांदगुडे 1-19);

सामनावीर- ज्ञानेश्वर राठोड

इक्यू टेक्नॉंलॉजीक संघाने 22 धावांनी सामना जिंकला.