सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ईगल्स संघाला विजेतेपद

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ईगल्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत ब्लॅक हॉक्स संघाचा 4-3असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत चुरशीच्या झालेल्या सामन्यात गोल्ड खुल्या दुहेरी गटात ईगल्सच्या अमित देवधर व अंकित दामले यांनी हॉक्सच्या बिपीन देव व हर्षद बर्वे यांचा 21-9, 21-9असा पराभव करून संघाला विजयी सुरुवात करून दिली.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पहिला सेट 12-5अशा स्थितीत असताना हॉक्सच्या शैलेश बोथराला दुखापत झाल्यामुळे त्यांनी हा सामना सोडून दिला व त्यामुळे ईगल्सच्या रवी कासट व शिव जावडेकर यांना पुढे चाल देण्यात आली.

गोल्ड खुला दुहेरी गटात ईगल्सच्या मिहीर केळकर व तुषार नगरकर या जोडीने हॉक्सच्या आलोक तेलंग व सुरेश वाघेला यांचा 21-16, 21-17 असा तर, सिल्वर खुला दुहेरी गटात ईगल्सच्या अनिश राणे व सारंग आठवले यांनी हॉक्सच्या अश्विन शहा व अमर श्रॉफ या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून 4-0अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

अखेर गोल्ड मिश्र दुहेरी गटात ईगल्सच्या मिहीर पाळंदे व ईशा साठे यांना हॉक्सच्या सुमेध शहा व दीपा खरे यांनी 17-21, 15-21असे तर, सिल्वर मिश्र दुहेरी गटात ईगल्सच्या गिरीश मुजुमदार व गौरी कुलकर्णी या जोडीला हॉक्सच्या आकाश सूर्यवंशी व राजश्री भावे यांनी 10-15, 13-15असे पराभूत केले.

49वर्षावरील गटात ईगल्सच्या राजेंद्र नखारे व विनायक करमरकर यांना हॉक्सच्या हेमंत पाळंदे व हरीश गलानी यांनी 11-21, 20-21असे पराभूत केले. पण सामन्यात आघाडीवर असलेल्या ईगल्स संघाने ब्लॅक हॉक्सवर 4-3अशा फरकाने विजय मिळवला.

याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ब्लॅक हॉक्स संघाने कॉमेट्स संघाचा 4-0असा तर, ईगल्स संघाने किंगफिशरचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. स्पर्धेतील विजेत्या ईगल्स संघाला करंडक व 30000रुपये, तर उपविजेत्या ब्लॅक हॉक्स संघाला करंडक व 20000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ट्रूस्पेसचे आश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे, खजिनदार आनंद परांजपे, व्यवस्थापन समितीचे सदस्य अविनाश जाधव, पीबीएलचे आयुक्त विवेक सराफ, उदय साने आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
ईगल्स वि.वि.ब्लॅक हॉक्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: अमित देवधर/अंकित दामले वि.वि.बिपीन देव/हर्षद बर्वे 21-9, 21-9; सिल्वर खुला दुहेरी गट: रवी कासट/शिव जावडेकर वि.वि.आनंद घाटे/शैलेश बोथरा 12-5,सामना सोडून दिला; गोल्ड खुला दुहेरी गट: मिहीर केळकर/तुषार नगरकर वि.वि.अलोक तेलंग/सुरेश वाघेला 21-16, 21-17; सिल्वर खुला दुहेरी गट: अनिश राणे/सारंग आठवले वि.वि.अश्विन शहा/अमर श्रॉफ 21-16, 21-18; गोल्ड मिश्र दुहेरी गट: मिहीर पाळंदे/ईशा साठे पराभूत वि.सुमेध शहा/दीपा खरे 17-21, 15-21; सिल्वर मिश्र दुहेरी गट: गिरीश मुजुमदार/गौरी कुलकर्णी पराभूत वि.आकाश सूर्यवंशी/राजश्री भावे 10-15, 13-15; 49वर्षावरील गट: राजेंद्र नखारे/विनायक करमरकर पराभूत वि.हेमंत पाळंदे/हरीश गलानी 11-21, 20-21);प्लेअर ऑफ द टाय: अमित देवधर/अंकित दामले

उपांत्य फेरी: ब्लॅक हॉक्स वि.वि.कॉमेट्स 4-0(गोल्ड खुला दुहेरी गट: बिपीन देव/हर्षद बर्वे वि.वि.पराग चोपडा/अनिकेत सहस्त्रबुद्धे 21-9, 21-18; सिल्वर खुला दुहेरी गट: अश्विन शहा/अमर श्रॉफ वि.वि.विनीत रुकारी/जनक वाकणकर 21-15, 10-21, 11-10; गोल्ड मिश्र दुहेरी गट: आकाश सूर्यवंशी/राजश्री भावे पुढे चाल वि.आनंद शहा/भाग्यश्री देशपांडे: 49वर्षावरील गट: शैलेश बोथरा/मिताली पुढे चाल वि.विमल हंसराज/राजशेखर करमरकर);

ईगल्स वि.वि.किंगफिशर 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: अमित देवधर/सारंग आठवले वि.वि.अद्वैत जोशी/संतोष पाटील 21-16, 21-13; सिल्वर खुला दुहेरी गट: रवी कासट/शिव जावडेकर पराभूत वि.अभिषेक ताम्हाणे/अनया तुळपुळे 12-15, 11-15; गोल्ड खुला दुहेरी गट: अनिकेत दामले/अनिश राणे वि.वि.मिहीर विंझे/केवल पाटील 21-11, 21-14;सिल्वर खुला दुहेरी गट: तुषार नगरकर/मिहीर केळकर पराभूत वि.मकरंद चितळे/नकुल दामले 9-21, 10-21; गोल्ड मिश्र दुहेरी गट: मिहीर पाळंदे/ईशा साठे वि.वि.तन्मय चोभे/वृषी फुरिया 21-15, 21-20; सिल्वर मिश्र दुहेरी गट: गौरी कुलकर्णी/गिरीश मुजुमदार पराभूत वि.अभिजित राजवाडे/गायत्री वर्तक 12-15, 5-15; 49वर्षावरील गट: राजेंद्र नखारे/विनायक करमरकर वि.वि.अनिल आगाशे/चारुदत्ता साठे 21-16, 21-10).

इतर पारितोषिके:
उत्कृष्ट खेळाडू:
गोल्ड खुला दुहेरी गट: पुरुष: सुमेध शाह; महिला: दीपा खरे;
सिल्वर खुला दुहेरी गट: पुरूष: अमर श्रॉफ; महिला: अनया तुळपुळे;
49वर्षावरील उत्कृष्ट खेळाडू: हरिश गलानी;
18वर्षाखालील उत्कृष्ट खेळाडू: पुरुष: तेजस चितळे; महिला: वृषी फुरिया;
किड्स गट: विजेते: ईशान लागू व पार्थ केळकर;
उपविजेते: आरुशी पांडे व दिया मुथा;
कॅप्टन चॉईस पुरस्कार: पुरुष: अनिश राणे; महिला: इशा साठे;
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट: पुरुष: मिहीर पाळंदे; महिला: ईशा साठे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात

ड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ