आता क्रिकेटचे सामने होणार केवळ १०० चेंडूंचे!

इंग्लड क्रिकेट बोर्डाने आज देशांतर्गत क्रिकेटमध्ये १०० चेंडूंच्या सामन्याच्या प्रस्ताव ठेवला आहे. याची सुरूवात २०२० मध्ये होणार असून यात महिला आणि पुरूषांचे ८ संघ त्यांच्या गटातून खेळणार आहेत. 

या स्पर्धेत १०० चेंडू एका डावात टाकले जाणार अाहेत.

यामूळे क्रिकेटकडे मोठ्या प्रमाणावर चाहते वळतील तसेच मोठ्या प्रमाणावर चाहते त्यांच्या परिवारासोबत सामने पहायला येतील. तसेच तरूण चाहतेही या स्पर्धेला लाभतील असे आजच्या बैठकीत सांगण्यात आले. 

 

यामूळे क्रिकेटची प्रसार व्हायलाही उपयोग होईल. 

या १०० चेंडूच्या डावात १५ षटके ही पारंपारिक पद्धतीने टाकली जातील तर राहिलेले १० चेंडू हे वेगळी रणनिती आखून टाकण्यात येईल. 

कोण खेळणार या स्पर्धेत- 

महिला आणि पुरूषांची होणार वेगळी स्पर्धा

किती संघ होणार सहभागी-

महिलांचे ८ संघ तसेच पुरूषांचे ८ संघ होणार सहभागी

कसा असणार फाॅरमॅट-

डावातील पहिली १५ षटके पारंपारिक पद्धतीने टाकली जाणार तर शेवटच्या १० चेंडूंसाठी वेगळी रणनिती असणार

काय आहे क्रिकेटच्या या प्रकारचा उद्देश-

नविन चाहत्यांना क्रिकेटकडे आकर्षित करणे

क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करणे

क्रिकेटमध्ये नाविन्य आणणे.