क्रिकेटच्या या नवीन प्रकारात गोलंदाज टाकणार सलग ५ किंवा १० चेंडू

क्रिकेटमध्ये काळानुसार बदल होत गेलेले सर्वांनीच पाहिले आहेत. तसेच ते बदल स्विकारण्यातही आले आहेत. त्याचमुळे आता टी20 क्रिकेट मोठे होत असतानाच 100 चेंडूंच्या क्रिकेटची चर्चा रंगू लागली आहे.याबद्दल आता बुधवारी(28 नोव्हेंबर) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने 100 चेंडूची क्रिकेट स्पर्धा 2020 पासून सुरु होइल, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर या प्रकारच्या खेळाच्या अटींसाठीही बुधवारी झालेल्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे.

या 100 चेंडूच्या क्रिकेट प्रकाराबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘या नवीन क्रिकेट प्रकारासाठी क्रिकेट समितीने ठेवलेल्या अटींना बोर्डाने मान्यता दिली आहे. यामध्ये  प्रत्येक संघ 100 चेंडू खेळेल. तसेच 10 चेंडूंनंतर एन्ड बदलला जाईल आणि गोलंदाज सलग पाच किंवा दहा चेंडू सलग टाकेल. तसेच गोलंदाज एका सामन्यात जास्तीत जास्त 20 चेंडू टाकू शकतो.’

2020-2024 च्या नवीन धोरणात 100 चेंडूंच्या क्रिकेट प्रकारासह काउंटी भागीदारी करार आणि काउंटी स्पर्धेच्या नवीन रचनेचा समावेश असले, असेही बुधवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत मान्य झाले आहे.

या क्रिकेटप्रकाराबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले, ‘या खेळाने खूप विकास केला आहे. तसेच हा खेळ खूप चर्चा आणि वादातून गेला आहे.  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला मिळून काम करणे गरजेचे आहे. जेणेकरुन क्रिकेटचा विकास होईल. मग तो कोणत्याही स्तरावर असो. पुढील 12 महिन्यासाठीची रणनीती खेळाला प्राधान्य देऊन आखली आहे .’

तसेच  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड या 100 चेंडूंच्या क्रिकेट प्रकाराच्या स्पर्धेसाठी जानेवारीमध्ये चर्चासत्र घेइल.

महत्त्वाच्या बातम्या:

रमेश पोवारांची उचलबांगडी पक्की, बीसीसीआयने मागवले महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आर्यलॅंडवर विजय

विराट कोहलीची खेळातील परिपूर्णता मोनालिसाच्या पेंटीगसारखीच

पृथ्वीच्या दुखापतीबरोबरच या गोष्टीमुळेही टीम इंडिया टेन्शनमध्ये