हा खेळाडू जिंकणार गोल्डन बूट, चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांची भविष्यवाणी

एडन हॅजार्डने केलेल्या हॅट्ट्रीकमुळे चेल्सीने कार्डीफला ४-१ने पराभूत करत प्रीमियर लीगमधील गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. त्याची ही कामगिरी बघत चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांनी तो गोल्डन बूट जिंकणार असल्याची ही भविष्यवाणी केली आहे

“एडनच्या या अप्रतिम कामगिरीमुळे तो या लीगचा गोल्डन बूट जिंकणार”, असे चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी म्हणाले.

“तो या सामन्यात ४० गोल करण्यास तयार आहे असे मला त्याने सांगितले होते” असेही सॅरी म्हणाले.

या २७ वर्षीय फुटबॉलपटूने लीगमध्ये सर्वाधिक असे पाच गोल करत अव्वल स्थान पटकावले आहे. चेल्सीने त्यांच्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. यावेळी या पाच सामन्यात एडनने पाच गोल केले तर २ असिस्ट केले आहेत.

२०१२ला चेल्सीमध्ये आल्यावर एडनने ९४ गोल केले आहेत पण त्याने कधीही एका वर्षात क्लबकडून  २० पेक्षा अधिक गोल नाही केले. त्याने २०१४-१५ ला १९ गोल करत उत्तम कामगिरी केली होती. तर मागच्या दोन हंगामात त्याने १७ गोल केले आहेत.

मागील हंगामात लीव्हरपूलच्या मोहम्मद सलाहने गोल्डन बूट जिंकला होता. यावेळी त्याने लीगमध्ये ३२ तर सगळ्या स्पर्धेत एकूण ४४ गोल केले होते.

२०१८-१९ प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारे फुटबॉलपटू –

एडन हजार्ड (चेल्सी) – ५ गोल
रोमेलू लुकाकू (मँचेस्टर युनायटेड) – ४गोल
सॅदीयो मॅने (लीव्हरपूल) – ४ गोल
अलेक्झांडर मिट्रोविच (फुलहॅम) – ४ गोल

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्मा एशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास उत्सुक

रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस