शिखर धवनची पालकांना कळकळीची विनंती

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आज भारतातील पालकांना कळकळीची विनंती केली आहे. आज जागतिक साक्षरता दिवस. याचे औचित्य साधून शिखर धवनने एक ट्विट केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये शिखर म्हणतो, ” शिक्षण हे प्राणवायू एवढच महत्त्वाचं आहे. मी सर्व पालकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्यावे. हे त्यांच्या जीवनातील सर्वात चांगलं शस्त्र असणार आहे. ”

शिखर धवनने आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे पाचव्या वनडे सामन्यातून आणि एकमेव टी२० सामन्यातून माघार घेतली होती. सध्या शिखर धवनने चांगल्या फॉर्ममध्ये असून तो लवकरच भारतीय संघाबरॊबर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसेल.