एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत उत्तरप्रदेश-मेघालय संघाला विजेतेपद

पुणे । सत्यमसिंगच्या २ गोलांच्या जोरावर उत्तरप्रदेश-मेघालय संघाने राजस्थान-आसाम संघाला पराभूत करताना भारतीय रोलबॉल संघटना व महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार अनिल शिरोळे व आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विनीत कुबेर, माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे सदस्य रेणू शर्मा, आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे चेअरमन वसंत राठी, भारतीय रोलबॉल संघाचे सचिव राजू दाभाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अंतिम लढतीमध्ये उत्तरप्रदेश संघाने राजस्थान संघाला ४-२ असे पराभूत केले. उत्तरप्रदेश संघाच्या सत्यमसिंगने २ गोल करतना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अनुजकुमार व पुष्पम पटेल यांनी प्रत्येकी १ गोल करतना सुरेख साथ दिली. राजस्थान-आसाम संघाकडून महिपालसिंगने २ गोल करताना चांगली लढत दिली.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये महिपाल सिंगच्या धडाकेबाज ७ गोलांच्या जोरावर राजस्थान-आसाम संघाने जम्मू-काश्मीर-तामिलनाडू संघाला ९-२ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. अनुराग पी.ने २ गोल करतना महिपालसिंगला सुरेख साथ दिली. जम्मू-काश्मीर-तामिळनाडू संघाकडून मनविजय सिंगने २ गोल केले.

उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये उत्तरप्रदेश-मेघालय संघाने गुजरात-छत्तीसगड संघाला ७-२ असे पराभूत करताना अंतिम फेरी गाठली. अनुजकुमारने ४, पुष्पम पटेलने २ तर सत्यमसिंगने १ गोल केला. गुजरात-छत्तीसगड संघाकडून अग्रेहा झमक्रंतने २ गोल केले.

महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकर केदार जाधवसाठी एमएस धोनीचा मराठमोळा अंदाज, पहा व्हिडिओ

मोहम्मद शमी अशी कामगिरी करणारा ठरला केवळ तिसराच वेगवान भारतीय गोलंदाज

युजवेंद्र चहलने हा पराक्रम करत केली कुंबळे, वॉर्न या दिग्गजांची बरोबरी