महिला क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम थोडक्यात हुकला, मिताली राजचा विक्रमही थोडक्यात वाचला

सिडनी । येथे सुरु असलेल्या एकमेव महिला कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या इल्लीसे पेरी या खेळाडूने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात नाबाद २१३ धावा केल्या. इंग्लंड विरुद्ध खेळताना तिने ३७४ चेंडूंचा सामना करताना तिने २४ चौकार आणि १ षटकार खेचला.

जागतिक महिला कसोटी क्रिकेटमध्ये कसोटीत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम किराण बलूच या पाकिस्तानी महिला क्रिकेटरचा आहे. तिने २०१४ साली विंडीजविरुद्ध खेळताना २४२ धावांची खेळी केली होती. तिचा हा विक्रम मोडण्यासाठी इल्लीसे पेरीला केवळ ३० धावांची गरज होती.

२१३ धावा करत इल्लीसे पेरी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय कर्णधार मिताली राजचा विक्रम (२१४) केवळ एका धावेने वाचला.

इल्लीसे पेरी ही सध्या वनडेत अष्टपैलू खेळाडूंमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल तर फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.

महिला कसोटी क्रिकेटमधील डावातील सर्वोच्च धावसंख्या
२४२ किराण बलूच (२००४)
२१४ मिताली राज (२००२)
२१३ इल्लीसे पेरी (२०१७)