एन्डयुरो साहसी क्रीडा स्पर्धा तेवीस फेब्रुवारीपासून 

पुणे: नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे २३ व २४ फेब्रुवारी रोजी एन्ड्युरो साहसी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यास्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

देशातील युवा पिढीमध्ये निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी गेली काही वर्षे ही स्पर्धाआयोजित केली जात आहे. यंदा या स्पर्धेसाठी आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बंगळुरू आदी ठिकाणच्यासंघांचा सहभाग निश्चित झाला आहे. आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, नॅशनल डिफेन्स अकॅडमी यांच्याकडून यंदाविजेतेपदाची अपेक्षा मानली जात आहे. प्रामुख्याने सिंहगड व पानशेत परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.त्यामध्ये सायकलिंग, डोंगराळ भागात पदभ्रमण, कयाकिंग, रिव्हर क्रॉसिंग आदी विविध साहसी क्रीडा प्रकारांचा समावेशआहे. ही स्पर्धा सांघिक स्वरुपाची असून प्रत्येक संघात तीन सदस्यांचा समावेश असतो.

या स्पर्धेसाठी १२० किलोमीटर अंतराच्या गटाकरिता सर्व पुरुष, सर्व महिला, मिश्र संघ (किमान एक सदस्य महिला) असेविभाग ठेवण्यात आले आहेत. ७० किलोमीटर अंतराच्या गटाकरिता एक सदस्य व दोन सदस्य असे दोन विभाग असणारआहेत. त्यापैकी दोन सदस्य संघात किमान एक महिला सदस्य असणे अनिवार्य आहे. २५ किलोमीटर अंतराची स्पर्धासर्वांसाठी खुली असणार आहे. नेहमीप्रमाणे अभियांत्रिकी, वैद्यकीय, उद्योजक, कार्पोरेट आदी विविध क्षेत्रातील हौशीखेळाडूंनी या स्पर्धेसाठी उत्सुकता दाखविली आहे.