चौथ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा घडला विलक्षण योगायोग

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथा कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा  केल्या आहेत.

या मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंड संघाची अवस्था एकवेळ ६ बाद ८६ अशी होती. त्यात ६वी विकेट ही अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची गेली होती. त्यानंतर फलंदाजीला सॅम करन आला. त्याने ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येत चक्क ६३ धावा केल्या होत्या.  त्यानंतर इंग्लंडने सामन्यात जबरदस्त कमबॅक करत १८० धावा केल्या आणि सामना जिंकला होता. सॅम करनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कालच्या सामन्यातही इंग्लंड संघाची अवस्था एकवेळ ६ बाद ८६ अशी होती. त्यात ६वी विकेट ही अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची गेली. त्यानंतर फलंदाजीला सॅम करन आला. त्याने ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ७८ धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात इंग्लंड संघानेच नाणेफेक जिंकली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

 अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील

 तिसरी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक