टीम इंडियाकडून कसोटीत सलामीसाठी मी तयार- रोहित शर्मा

भारताची सध्या इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ते या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहेत.

या दोन्ही सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. फक्त पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने चांगली लढत दिली होती. परंतू अन्य फलंदाज मात्र संघर्ष करत आहेत. त्याचबरोबर भारताचे सलामीला येणारे फलंदाजही अपयशी ठरले आहेत.

त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी आता सलामीला कोणाला संधी द्यायची असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.

भारताचा मर्यादित षटकांच्या संघातील सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी संधी देण्यात आलेली नाही. परंतू त्याने सलामीला फलंदाजी करण्याची तयारी दाखवली आहे.

तो म्हणाला, “मी कधीही कसोटीमध्ये मला सलामीला पाठवा असे कधी म्हणालो नाही. पण मी संघ व्यवस्थापन म्हणेल तिथे मी सलामीला खेळू शकतो. मी खेळायला सुरु केले तेव्हा कधीही वनडेमध्ये सलामीला खेळेल असा विचार केला नव्हता. पण ते झाले.”

“त्यामुळे मी माझे पर्याय खुले ठेवतो. कोणताही पर्याय माझ्यासाठी बंद नसतो. जर मला संधी आली तर मी ती स्विकारतो.”

पुढे रोहित म्हणाला, “मला कसोटी संघाचा भाग व्हायचे होते. पण ते माझ्या हातात नाही. मला संधीची वाट पहावी लागेल. ती जेव्हा पण येईल तेव्हा मी त्यासाठी तयार असायला हवे. मी यासाठी सर्व काही करतो. जेणेकरुन जेव्हापण मला संधी मिळेल तेव्हा मी त्यासाठी तयार असेल.”

त्याचबरोबर भारतीय संघाला कसोटीत मिळालेल्या पराभवानंतरही पाठिंबा देत असल्याचे सांगत तो म्हणाला, “भारतीय संघ चांगला खेळ करु शकतो यावर आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. हे तितके सोपे नाही. आम्ही दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी सामना हरल्यानंतर जोहान्सबर्गच्या कसोटीतून पुनरागमन करत ती कसोटी जिंकली होती.”

रोहितने आत्तापर्यंत 25 कसोटी सामने खेळले असून 3 शतके आणि 9 अर्धशतकांसह 1479 धावा केल्या आहेत.

भारताचा इंग्लंड विरुद्ध तिसरा कसोटी सामना शनिवार 18 आॅगस्टपासून सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दोन वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या गौतम गंभीरला बीसीसीआय देणार एक कोटी रुपये

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ!

खास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी