लॉर्ड्स कसोटी- तिसऱ्या दिवशीच्या लंचला टीम इंडियाने मारला बीफ वर ताव, चाहत्यांनी सुनावले खडे बोल

भारत-इंग्लड यांच्यात सध्या लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी असेलेल्या लंच मेनूचा फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर करत भारतीय चाहत्यांचा रोष ओढावून घेतला आहे.

या फोटोतील मेनूमध्ये बीफचे मटन असल्याने भारतातील गोरक्षकांनी टीम इंडियाला जोरदार धारेवर धरले आहे. तसेच एका  चाहत्याने बीफ खाण्यात भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्रीच पुढे असणार असे म्हणत त्यांच्यावर निशान साधला. तर काही चाहत्यांनी भारतीय संघातील खेळाडूंनी बीफ खाण्याचे समर्थन केले.

इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 357 धावा केल्या आहेत.

त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून या डावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने शतक तर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक केले आहे.

भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाखेर 107 धावांवर संपूष्टात आल्याने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव सुरु झाला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-सचिन तेंडुलकर म्हणतो कसोटी क्रिकेट वाचवायचे असेल तर हे करायलाच हवे

-फलंदाजीपेक्षा संजय मांजरेकर घंटा चांगली वाजवतात