टॉप ५: इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष

लंडंन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज(9 आॅगस्ट) लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

या सामन्यात काही खास विक्रम होऊ शकतात ते असे-

– कसोटी कारकिर्दीत 4 हजार धावा करण्यासाठी मुरली विजयला 67 धावांची गरज. त्याने 58 सामन्यात 40.13 च्या  सरासरीने 3933 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा 16वा भारतीय खेळाडू बनण्याची विजयला संधी आहे.

-कसोटी कारकिर्दीत 3 हजार धावा करण्यासाठी अजिंक्य रहाणेला 90 धावांची गरज. त्याने 46 सामन्यात 42.17च्या सरासरीने 2910 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा 22वा भारतीय खेळाडू बनण्याची रहाणेला संधी आहे.

-वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडला कसोटीत 3 हजार धावा करण्यासाठी केवळ 12 धावांची गरज. त्याने 119 सामन्यात 19.78 च्या सरासरीने 2988 धावा केल्या आहेत.

याबरोबरच त्याला कसोटीत 3000 धावा आणि 400 विकेट्स घेणारा पाचवा अष्टपैलू खेळाडू होण्याचीही संधी आहे. यापुर्वी कपिल देव, रिचर्ड हॅडली, शेन वार्न आणि शाॅन पाॅलोकने हा कारनामा केला आहे.

-भारताविरुद्ध कसोटीत 100 विकेट्स घेण्यासाठी जेम्स अॅंडरसनला 10 विकेट्सची गरज. त्याने भारताविरुद्ध 23 कसोटीत 90 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध कसोटीत मुथय्या मुरलीधरनने 105 तर इम्रान खानने 94 विकेट्स घेतल्या आहेत.

-एकाच मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी 6 विकेट्सची गरज आहे. याआधी असा कारनामा मुथय्या मुरलीधरनने केला आहे. अँडरसनने लॉर्ड्स मैदानावर 22 सामन्यात 94 विकेट्स घेतल्या आहेत.

-याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये 550 विकेट्स घेण्यासाठी अँडरसनला 6 विकेट्सचीच गरज आहे.

-इशांत शर्माला 250 कसोटी विकेट्स पूर्ण करण्यासाठी 6 विकेट्सची गरज. अशी कामगिरी करणारा 7 वा भारतीय गोलंदाज बनण्याची इशांतला संधी. त्याने 83 कसोटीत 244 विकेट्स घेतल्या आहेत.

-लॉर्ड्सच्या मैदानावर 2000 धावा पूर्ण करण्यासाठी अॅलिस्टर कूकला 84 धावांची गरज. अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज होण्याची संधी. याआधी ग्रॅहम गुच(2015 धावा) यांनी केली आहे अशी कामगिरी.

कूकने लॉर्ड्सवर 25 सामन्यात 43.54 च्या सरासरीने 1916 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना

अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण

सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार