दुसरी कसोटी: भारताचा पहिला डाव ३६ षटकातच संपुष्टात; अँडसनने घेतल्या ५ विकेट्स

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.

या सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (10 आॅगस्ट) सामन्याला सुरुवात झाली. परंतू दुसऱ्या दिवशीही पावसाचा सातत्याने व्यत्यय येत होता.

अखेर या दिवशी 35.2 षटकांचा खेळ झाला. भारताचा डाव संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळही संपला असल्याचे पंचांनी जाहिर केले.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या निर्णयाला अचूक ठरवत इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने चांगली सुरुवात केली. त्याने भारताचे सलामीवीर फलंदाज मुरली विजय(0) आणि केएल राहुलला(10) लवकर बाद केले.

त्यानंतर पुन्हा एकदा पावसाच्या व्यत्ययानंतर दुसऱ्या सत्रात खेळ सुरु झाल्यावर खेळपट्टीवर स्थिर झालेला चेतेश्वर पुजारा(1) भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या चुकीने धावबाद झाला.

पुजारा धावबाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या सत्रात केवळ 2 षटकांचाच खेळ झाला. यानंतर तिसऱ्या सत्रात खेळाला पुन्हा सुरुवात केल्यावर कोहलीला 23 धावांवर असताना ख्रिस वोक्सने बाद केले.

यामुळे भारताची आवस्था 4 बाद 49 धावा अशी झाली. यानंतरही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकले नसल्याने त्यांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

भारताच्या पहिल्या डावात आर आश्विनने सर्वाधिक 29 धावा केल्या. अन्य फलंदाजांपैकी अजिंक्य रहाणे(18), हार्दिक पंड्या(11), दिनेश कार्तिक(1), आणि मोहम्मद शमी(10) यांनी धावा केल्या.

इंग्लंडकडून अँडरसनने सर्वाधिक 20 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच बाकी गोलंदाजापैकी ख्रिस वोक्स(2/19), स्टुअर्ट ब्रॉड(1/37) आणि सॅम करन(1/26) यांनी विकेट्स घेतल्या

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी