फक्त त्या कारणामुळे भारतच मारणार लॉर्ड्सचे मैदान!

भारत-इंग्लंड यांच्यात गुरवारपासून (९ ऑगस्ट) लॉर्ड्स मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने एजबस्टन येथे भारतावर ३१ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पिछाडीवर असलेल्या भारताला या सामन्यात विजय मिळवत मालिकेत पुनरागमन करण्याची संधी असणार आहे.

यासाठी लॉर्ड्सचा इतिहासही भारताच्या बाजूने आहे.

इंग्लंडने लॉर्ड्सवर आशियाई संघाविरुद्ध खेळलेल्या, गेल्या पाच सामन्यात एकही विजय मिळवला नाही.

२०१४ ते २०१८ या कालावधीत इंग्लंड लॉर्ड्सवर भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध पाच सामने खेळला आहे. त्यामध्ये भारताविरुद्ध पराभव, श्रीलंकेविरुद्ध दोन्ही सामने अनिर्णित तर पाकिस्तान विरुद्ध दोन्ही सामन्यात इंग्लंड पराभूत झाला आहे.

२०१४ साली झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, भारताने इंग्लड विरुद्ध लॉर्ड्सवर मालिकेतील एकमेव विजय मिळवला होता.

यामध्ये अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात १०३ धावा करत दमदार शतक झळकावले होते. तर दुसऱ्या डावात इशांत शर्माने ७ विकेट पटकावत इंग्लंडला चारी मुंडया चित केले होते.

आजच्या या सामन्यात, २०१४ सालच्या लॉर्ड्सवरील विजयाचे शिल्पकार रहाणे आणि इशांत शर्मा दोघेही संघात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकते.

आजपासून सुरु होणारा भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सवरील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आजुनही सुरु झाला नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टॉप ५: इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष

एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना