काय सांगता! चक्क इंग्लंडचा प्रशिक्षकच खेळाडू म्हणून उतरला मैदानात

2019 विश्वचषकातील तिसरा सराव सामना काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला 12 धावांनी पराभूत केले. पण याच सामन्यात एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली. ती म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सध्याचा सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगहुड क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता.

इंग्लंडचे मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर हे दोन खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने कॉलिंगवूडला हा निर्णय घ्यावा लागला. तो वूडची जर्सी घालून राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता.

या सामन्यात इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण यावेळी वूड त्याचे चौथे षटक टाकत असताना त्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास होत झाल्याने तो मैदानातून बाहेर गेला.

त्याच्याऐवजी या सामन्यात विश्रांती दिलेला जोफ्रा आर्चर मैदानात आला. पण तोही काही वेळात डीपला क्षेत्रकक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला.

त्यामुळे या सामन्यासाठी जो रुटला मैदानात उतरावे लागले. रुटलाही या सामन्यासाठी सुरुवातीला विश्रांती दिली होती. परंतू आर्चर आणि वूड दोघेही मैदानाबाहेर गेल्याने त्याला क्षेत्ररक्षणासाठी यावे लागले.

त्याचबरोबर या सामन्यासाठी इंग्लंडचा नियमित कर्णधार इयान मॉर्गनही बोटाचे फ्रॅक्चर झाल्याने उपलब्ध नव्हता. तसेच त्यांचा फिरकी गोलंदाज आदिल राशिदही खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नव्हता. या सर्वगोष्टींमुळे कॉलिंगवूडला मैदानात यावे लागले.

कॉलिंगवूड 2011 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेला नाही. तसेच त्याने 2018 मध्ये सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आत्तापर्यंत 68 कसोटी, 197 वनडे आणि 36 टी20 सामने खेळले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

जडेजाच्या अर्धशतकानंतर चाहत्यांनी केले असे जोरदार सेलिब्रेशन, पहा व्हि़डिओ

रविंद्र जडेजाचे न्यूझीलंड विरुद्ध शानदार अर्धशतक, अन्य फलंदाजांची कामगिरी मात्र सुमार

विश्वचषक २०१९: या कारणामुळे इंग्लंडच्या कर्णधाराला मुकावे लागले पहिल्या सराव सामन्याला