आणि त्याच्या अफलातून खेळीने करुन दिली केविन पिटरसनची आठवण

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

सामन्यातील चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी जबरदस्त खेळी करत हा पराभव पाचव्या दिवसापर्यंत लांबवला आहे. बेन स्टोक्सने १८७ चेंडूत ६२ तर जाॅश बटलरने १७६ चेंडूत १०६ धावा केल्या.

यातील जाॅश बटलरची खेळी इतकी विस्फोटक होती की १०० धावांतील ८४ धावा त्याने केवळ चौकारांच्या मदतीने जमवल्या होत्या.

शतकी खेळी केलेल्या खेळाडूने चौकारांच्या मदतीने केलेल्या या सर्वाच्च धावा होत्या.

केला पिटरसन एवढाच विक्रम-

त्याने ही खेळी करताना त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनच्या एका विक्रमाची बरोबर केली आहे. भारताविरुद्ध जगात कोठेही चौथ्या डावात शतकी खेळी करणारा तो इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

पीटरसनने २००७मध्ये ओव्हल कसोटीत भारताविरुद्ध चौथ्या डावात शतकी खेळी केली होती. तो सामनाही ड्राॅ राहिला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?