हॉकी विश्वचषक २०१८:  न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14 हॉकी विश्वचषकात इंग्लंडने न्यूझीलंडला 2-0 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.

या सामन्यात इंग्लंडच्या कॅलनन विल आणि टेलर ल्यूक यांनी हे दोन विजयी गोल केले. तसेच इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत 12 डिसेंबरला बलाढ्य अर्जेंटिनाला भिडणार आहे.

दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा असल्याने दोघांनीही आक्रमकपणे सामन्याला सुरूवात केली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी हल्ले करण्यास सुरूवात केली. यामध्ये इंग्लंडच्या अॅन्सेल लिआमने संघासाठी पेनल्टी कॉर्नर जिंकला. यावेळी ड्रॅगफ्लिकर ग्लेगोर्ने मार्कने लगावलेला शॉट गोलकिपर जॉयस रिचर्डने अडवत इंग्लंडला आघाडी घेण्यापासून थांबवले.

पहिल्या सत्रात न्यूझीलंडने त्यांचा बचावात्मक पवित्रा कायम ठेवत इंग्लंडच्या खेळाडूंना पेनल्टी सर्कलमध्ये येण्यापासून रोखले होते.

इंग्लंडच्या विलने न्यूझीलंडची बचावफळी मोडत या सामन्यातील पहिला गोल नोंदवला. त्याने कर्णधार रॉपर फिलने केलेल्या पासवर 25व्या मिनिटाला हो गोल केला. तसेच हा त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिला गोल ठरला.

नंतरच्या तिसऱ्या सत्रात न्यूझीलंडचे सामना बरोबरी करण्याचे प्रयत्न सुरू होता. मात्र दोन्ही संघ एकमेकांना चांगलेच टक्कर देत होते. यामध्ये इंग्लंडला 38व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाली. ल्यूककडून ड्रॅगफ्लिक शॉट थोडक्यात मुकला. पण 7 मिनिटांच्या फरकाने त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्या पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये केले.

इंग्लंडने मागील सामन्यात आयर्लंडला 4-2 असे पराभूत केले. त्याच सामन्यातील फॉर्म कायम ठेवत आजच्या सामन्यातही उत्तम कामगिरी करत होते.

न्यूझीलंडकडून चार सामन्यात दोन गोल करणारा रसेल केन आजच्या सामन्यात अपयशी ठरला. यावेळी चौथ्या सत्रात पहिला गोल करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. पण इंग्लंड त्याला जुमानत नव्हती.

या सत्रात न्यूझीलंडला गोल करण्याची संधी होती पण इंग्लंडचा गोलकिपर जॉर्ज पिनेर याने त्याचे उत्तम कौशल्य दाखवत त्यांचे हल्ले परतवले.

या विश्वचषकात पहिल्या सामन्यात फ्रान्सवर 2-1 असा विजय मिळवणारा न्यूझीलंड या पराभवाने स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

रोनाल्डोचे मेस्सीला आव्हान, चाहते आले टेन्शनमध्ये

अजिंक्य रहाणेवर टीका करणाऱ्यांनी त्याची आधी ही परदेशातील आकडेवारी नक्की पहावी

पुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष