- Advertisement -

स्टोक्स शिवाय इंग्लंड अॅशेस मालिका जिंकू शकत नाही: इयान चॅपेल

0 114

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सविषयी सिडनी डेली टेलिग्राफला मुलाखत देताना आपले मत काहीसे परखड आणि स्पष्टपणे मांडले आहे. चॅपेल म्हणाले “बेन स्टोक्स शिवाय इंग्लंड जिंकू शकत नाही. याला अनेक कारणे आहेत.”

ते पुढे म्हणाले “त्याची क्षमता ही तर मुख्य गोष्ट आहेच परंतु तो एक मॅच विनर खेळाडू आहे. आणि असे खेळाडू सर्वांना सोबत घेऊन चांगला खेळ करतात. मजबूत प्रतिस्पर्ध्यां विरोधात खेळताना त्याचा खेळ उंचावतो. ज्यामुळे संघातील अन्य सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आणि माझ्या मते त्याच्या शिवाय इंग्लंडला विजयाची काही अशा नाही.”

तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर म्हणाले “स्टोक्स अशा क्रिकेट खेळाडूंपैकी आहे ज्याला मैदानावर खेळताना पाहायला आवडते. त्याची खेळाची एक वेगळी शैली आहे. त्याची खेळातली आक्रमकता रोमांचकारी आहे. जर तो संघात नसला तर तो इंग्लंडसाठी नक्कीच एक मोठा धक्का असेल.”

सोमवारी नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याप्रकरणी बेन स्टोक्सला अटक करण्यात आली होती. त्यानंतरही स्टोक्सला अॅशेस मालिकेसाठी उपकर्णधार पदी कायम ठेवण्यात आले आहे. यावर्षीची अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात होणार असून २३ नोव्हेंबर पासून या मालिकेला सुरुवात होईल.

बेन स्टोक्सने २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच आपले पदार्पण केले होते. त्याने २०१३ पासून ३९ कसोटी सामन्यात  २४२९ धावा केल्या आहेत आणि ९५ विकेट्स घेतल्या आहेत.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: