इंग्लंड संघ अॅशेससाठी ऑस्ट्रेलियाला रवाना

पुढील महिन्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. या विषयी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरून माहिती दिली. त्यांनी ऍलिस्टर कूकचा आणि स्टुअर्ट ब्रॉडचा विमानतळावरील फोटो पोस्ट केला आहे.

पुढील महिन्यात २३ तारखेपासून अॅशेस मालिकेला सुरुवात होत आहे. मागच्या वर्षी ही मालिका इंग्लंडने जिंकली होती. तर आत्तापर्यंत इंग्लंडने ३२ तर ऑस्ट्रेलियानेही ३२ वेळा या मालिकेत विजय मिळवला आहे.

इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी ज्यो रूट आहे. तर उपकर्णधार म्हणून बेन स्टोक्सचे नाव घोषित करण्यात आले होते. परंतु त्याला मागील महिन्यात मारहाणीच्या प्रकरणामुळे अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची अजून चौकशी चालू आहे.  त्यामुळे त्याच्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात होणारी ही मालिका मानाची मानली जाते.