श्रीलंकेमध्ये सफारीला गेलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंची जीप अडकली चिखलात

इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 10 आॅक्टोबरपासून श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पण पहिलाच सामना पावसामुळे वाया गेला.

त्यामुळे इंग्लंडच्या संघाने काल(13 आॅक्टोबर) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्याआधी सफारीचा आनंद घेतला आहे. ते काउडुल्ला नॅशनल पार्कमध्ये जीप सफारीसाठी गेले होते. या सफारीचे फोटो इंग्लंड क्रिकेट बोर्डने शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये बेन स्टोक्स, लियाम डावसॉन, ओली स्टोन, जॉनी बेअरस्टो, आॅली पोप आणि ख्रिय वोक्स हे या सफारीची मजा घेताना दिसून येत आहेत.
https://twitter.com/englandcricket/status/1050397575860416512

मात्र त्याचबरोबर या सफारी दरम्यान जॉनी बेअरस्टो, आॅली पोप आणि  बेन स्टोक्स यांची जीप चिखलात अडकली होती. त्यामुळे त्यांची ही जीप चिखलातून बाहेर काढण्यासाठी तेथील स्थानिक रहिवासींनी मदत केली.

या खेळाडूंव्यतिरिक्त मोइन अली आणि जॉस बटलर हे दोघे 80 मीटरवर असणारा सिगिरियाचा प्राचीन किल्ला पाहण्यासाठी गेले होते.

इंग्लंडने या वनडे मालिकेत दुसरा सामना डकवर्थ लूईस नियमानुसार 31 धावांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या सामन्यात कर्णधार इयान मॉर्गन(92) आणि जो रुट(71) यांनी अर्धशतके करत इंग्लंडला प्रथम फलंदाजी करताना 278 धावांचा टप्पा गाठून देण्याता महत्त्वाचा वाटा उचलला होता. तर श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने या सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

इंग्लंडने दिलेल्या 279 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची आवस्था 29 षटकात 5 बाद 140 धावा अशी होती. परंतू त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना थांबवण्यात आला आणि डकवर्थ लूईस नियमानुसार इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या:

टिम इंडियाला मोठा धक्का; मुंबईकर शार्दुल ठाकुर हैद्राबाद कसोटीतून बाहेर

-भारत-चीन फुटबॉल सामना सुटला बरोबरीत

या वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन