इंग्लंड ऍशेस मालिका बेन स्टोक्स शिवाय जिंकू शकते: मिचेल जॉन्सन

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने असे वक्तव्य केले आहे की इंग्लंड बेन स्टोक्स शिवायही ऍशेस मालिका जिंकू शकते. ऍशेसची मानाची ट्रॉफी मागील वर्षी इंग्लंडमध्ये इंग्लंडने जिंकले होती.

शनिवारी इंगलंडचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिका खेळण्यासाठी रवाना होईल. पण या संघात स्टोक्सचा समावेश नाही. स्टोक्सवर ब्रिस्टॉलच्या हाणामारी प्रकरणी अजून चौकशी चालू आहे, यामुळेच त्याला देश सोडून बाहेर जाण्याची परवानगी नाही. पण ऍशेस मालिकेत ५ सामने खेळण्यात येणार आहेत आणि ५ ही सामन्यात बेन स्टोक्स खेळणार नाही अशी कोणतीही माहिती इंग्लंड बोर्डाने दिलेली नाही. ऍशेस मालिकेची सुरुवात २३ नोव्हेंबर पासून होणार आहे.

या सर्व गोष्टी अश्या असताना सुद्धा ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन म्हणतो,” स्टोक्स नाही म्हणजे इंग्लंड नाही असे काही नाही. ऍशेस मालिका ही खूप जास्त प्रतिष्टेची मालिका आहे. यामध्ये संघावर खूप दवाब असतो. त्यामुळे मला अजिबात असे वाटत नाही की इंग्लंड बेन स्टोक्स शिवाय जिंकू शकत नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने असा विचार करणे की इंग्लंडचा संघ बेन शिवाय जिंकू शकत नाही हे त्यांच्यासाठी खूप धोकादायक असणार आहे.”

“मला अजूनही असे वाटते की ऑस्ट्रेलिया ही ऍशेस मालिका जिंकेल पण मागील काही काळातील दोनीही संघानी उत्तम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया मधील खेळपट्टी ही आधी पेक्षा जास्त बाउन्स होणाऱ्या आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज जास्त प्रभावी ठरतील.”

२०१५मध्ये मिचेलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. २०१३-१४मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडला ऍशेस मालिकेत ५-० असे हरवले होते, तेव्हा मिचेल जॉन्सन त्यांचा प्रमुख गोलंदाज होता. त्याने त्या मालिकेत ३७ विकेट्स घेतल्या होत्या.