जेम्स अँडरसन इंग्लंडचा नवा उपकर्णधार

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची आगामी ऍशेस मालिकेसाठी इंग्लडच्या उपकर्णधारपदी निवड झाली. यापूर्वी उपकर्णधार म्हणून बेन स्टोक्स जबाबदारी पार पाडत होता.

परंतु ब्रिस्टॉल शहरात नाइट क्लबबाहेर केलेल्या हाणामारीमुळे तो सध्या संघाबाहेर आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही सामील करण्यात आले नाही.

अँडरसन हा इंग्लडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने १२९ कसोटीत ५०६ विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ६वा आहे.

ऍशेस मालिकेला २३ नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे.