मोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा

नाॅटिंगघम | भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटीमधीलच १३ खेळाडूंचा संघ कायम ठेवला आहे.

हा सामना १८ आॅगस्टपासून ट्रेंटब्रीज, नाॅटिंगघम येथे सुरू होणार आहे.

यामुळे बेन स्टोक्स तसेच डेव्हिड मलानला या सामन्यातही खेळता येणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

स्टोक्सच्या जागी संधी दिलेल्या वोक्सने दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना नाबाद १३७ धावा तर केल्याच तसेच दोन्ही डावात मिळून ४ विकेट्सही घेतल्या.

तर मालनच्या जागी संधी मिळालेल्या पोपने २८ धावा करत कारकिर्दीची आश्वासक सुरुवात केली आहे. त्याला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही.

तिसऱ्या  कसोटीसाठी असा असेल इंग्लंडचा संघ-

जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअस्ट्रो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉश बटलर, अँलिस्टर कुक, सॅम करन, केटॉन जेनिंग्स, ओली पोप, जिमी पोर्टर, आदिल राशिद आणि ख्रिस वोक्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण

एकही धाव, झेल किंवा विकेट न घेणाऱ्या खेळाडूला मिळाले ११ लाख

अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती