जेव्हा इंग्लंडचे खेळाडू पॉन्टिंगला विचारतात स्मिथला बाद करायचा फॉर्मुला

सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो ज्या सामन्यात खेळत आहे तो सामना तो संघाला जिंकून देत आहे. अशा खेळाडूबद्दल बोलताना जगातील सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग मंत्रमुग्ध होतो.

रिकी पॉन्टिंगने दावा केला आहे की त्याच्याकडे इंग्लंडचे खेळाडू मार्गदर्शनाला आले होते. त्यात त्यांनी मुख्यतः स्मिथला कसे बाद करायचे हेच प्रश्न विचारले.

” माझ्याकडे इंग्लडचे खेळाडू आले होते. ते सकाळी जेव्हा आले तेव्हा त्यांनी आम्हाला स्मिथला बाद करायच्या टिप्स मागितल्या. आम्ही त्याला कशी गोलंदाजी करू असेही ते विचारत होते. तेव्हा मी म्हणालो, ‘मी तुम्हाला काहीही सांगणार नाही आणि मला स्वतःलाही माहित नाही. स्मिथला आता थांबवणे आता अवघड आहे. ” असे हा जगजेत्ता कर्णधार म्हणाला.