महिला विश्वचषक- दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून इंग्लंड अंतिम फेरीत

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट महिला विश्वचषकात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीच्या या सामन्यात इंग्लंडने आफ्रिकेला तीन विकेट राखून पराभूत केले.

दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित ५० षटकांत ६ विकेट्सच्या बदल्यात २१८ धावा केल्या होत्या. वहीं प्रीजने आफ्रिकेकडून नाबाद रहात ९५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. सलामीवर लॉरा वोलवार्डटने १०० चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.

२१९ धावांच लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या शतकापर्यंत झगडावे लागले. त्यांनी ७ विकेट्सच्या बदल्यात २ चेंडू शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले. यात इंग्लंडकडून सारा टेलरने सर्वाधिक ५४ धावा केल्या, तर विल्सन आणि नाईटने प्रत्येकी ३० धावा केल्या. ऑफ्रिकेकडून खाका आणि ल्यूसने प्रत्येकी २, तर इस्माईल, कॅप आणि डॅनियलने प्रत्येकी एक बळी मिळवला.

इंग्लंडने या विजयाबरॊबर ५व्यांदा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्यफेरी-२ चा सामना उद्या भारत आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघामध्ये रंगणार आहे. जिंकणारा संघ यजमान इंग्लंड विरुद्ध विजेतेपदासाठी २३ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.