तब्बल ९६ वर्षांनंतर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये केला असा पराक्रम

लीड्स। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात हेडिंग्ले, लीड्स येथे पार पडलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

इंग्लंडने कसोटी सामना 1 विकेटने जिंकण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. याआधी इंग्लंडने कसोटीत एका विकेटने 96 वर्षांपूर्वी शेवटचा विजय मिळवला होता. हा विजय इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये 1923 ला मिळवला होता. त्यानंतर पहिल्यांदाच इंग्लंडने 1 विकेटने कसोटी सामना जिंकला आहे.

1923 च्या आधी इंग्लंडने 1902 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओव्हल मैदानावर 1 विकेटने विजय मिळवला होता. तसेच त्यानंतर 1908 मध्येही इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत 1 विकेटने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे इंग्लंडने मिळवलेले ऑस्ट्रेलिया विरुद्धचे हे दोन्ही विजय ऍशेस मालिकेतीलच होते.

आज पार पडलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लंडकडून या विजयात बेन स्टोक्सने नाबाद 135 धावांची शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय साकारुन दिला.

इंग्लंडने कसोटी सामन्यात 1 विकेट्सने मिळवलेले विजय – 

1902 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल

1908 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न

1923 – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन

2019 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लीड्स

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रोमांचकारी झालेल्या तिसऱ्या ऍशेस सामन्यात इंग्लंडचा १ विकेटने विजय

…म्हणून पीव्ही सिंधूने ऐतिहासिक सुवर्णपदक केले आईला समर्पित

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी!