HWL 2017: आज उपांत्यपूर्व सामन्यात होणार इंग्लड विरुद्ध अर्जेंटीना अशी लढत

हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये इंग्लडचा आजचा सामना अर्जेंटीना विरुद्ध आहे. इंग्लड आणि अर्जेंटीनामध्ये आजचा सामना उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी असेल.

या स्पर्धेतील साखळी सामन्यात इंग्लडचा संघ ३ सामने खेळला. इंग्लडचा पहिला सामना जर्मनी विरुद्ध होता. या सामन्यात इंग्लडचा ०-२ अश्या फरकाने पराभव झाला.

दुसरा सामना भारताविरुद्ध होता हा सामना इंग्लड ३-२ अश्या फरकाने जिंकला. तिसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होता. हा सामना ०-० असा अनिर्णयीत सोडवला.

या स्पर्धेतील साखळी सामन्यात अर्जेंटीना संघ ३ सामने खेळला. संघाचा पहिला सामना बेल्जियम विरुद्ध होता. अर्जेंटीना हा सामना २-३ अश्या फरकाने हरला.

दुसरा सामना नेदरलँड्स संघाबरोबर होता. हा सामना ३-३ अश्या बरोबरीने सोडविला. तर तिसरा सामना स्पेन संघाबरोबर होता. हा सामना अर्जेंटीना १-२ अश्या फरकाने हरला.

अर्जेंटीना जागतिक क्रमांकात १ ल्या क्रमांकावर असून इंग्लड ७ व्या क्रमांकावर आहे.