इंग्लंड दौऱ्यासाठी अशी आहे टीम आॅस्ट्रेलिया, संघाचे नेतृत्व या खेळाडूकडे

सिडनी | आॅस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनकडे इंग्लंड दौऱ्यासाठी वनडेचे नेतृत्व देण्यात आले आहे. ५ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी उपकर्णधारपद अॅराॅन फिंचकडे देण्यात आले आहे.

टी२० सामन्यासाठी अॅराॅन फिंच कर्णधार असुन अॅलेक्स कॅरेकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

लवकरच क्रिकेट आस्ट्रेलिया वनडेसाठी नियमीत कर्णधाराची निवड करणार आहे असे निवड समिती प्रमुख यावेळी म्हणाले.

Read- आयपीएलमधून या देशाचे ४ दिग्गज खेळाडू मायदेशी परतणार

इंग्लंड दौऱ्यात आॅस्ट्रेलिया ५ वनडे आणि एक टी२० सामना खेळणार आहे. हा दौरा वनडे मालिकेने १३ जूनला सुरू होत असुन २७ जूनला एकमेव टी२० मालिकेने संपेल.

मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या मालिकेत दुखापतीमुळे खेळत नाहीत.

Read-भाऊ! टीम इंडियाला कसोटी मालिकेत त्रास नाही द्यायचा!

इंग्लंड दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलियाची वनडे टीम-

अॅश्टन एजर, अॅलेक्स कॅरे ( यष्टीरक्षक), अॅराॅन फिंच (उपकर्णधार), जोश हेजलवुड, ट्रविस हेड, नॅथन लायन, शाॅन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जे रिचर्डसन, डी’आर्की शॉर्ट, बीली स्टनलेक, मार्कोस स्टोनिसीस, अॅंड्रु टाय

इंग्लंड दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलियाची टी२० टीम-

अॅश्टन एजर, अॅलेक्स कॅरे ( उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), अॅराॅन फिंच (कर्णधार), ट्रविस हेड, निक मॅडिसन, ग्लेन मॅक्सवेल, जे रिचर्डसन,  केन रिचर्डसन,  डी’आर्की शॉर्ट, बीली स्टनलेक, मार्कोस स्टोनिसीस, मिचेल स्वेपन, अॅंड्रु टाय, जॅक वाईल्डमुथ

Read-अल्बम: कोहलीसह बेंगलोरच्या खेळाडूंनी मारला सिराजच्या घरी बिर्याणीवर ताव