इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी अभियानाची सुरुवात विजयाने करणार का?

आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा पाहिला सामना यजमान इंग्लंड आणि आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेशच्या संघामध्ये होत आहे. इंग्लंडला २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर बांग्लादेशने नेहमीच आयसीसी ट्रॉफीमध्ये मोठ्या मोठ्या संघाना हरवून सर्वाना चकित केले आहे.

बांग्लादेश आणि इंग्लंड या दोनही संघानी मागील काही काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. इंग्लंडकडे खुपच आक्रमक आणि लांबलचक अशी फलंदाजीची फळी आहे जी कि कधी कधी त्याच्या ११व्य फलंदाजपर्यंत जाते. ईऑन मॉर्गन आणि जो रूट या अनुभवशील फलंदाजांचा या संघात समावेश आहे, ज्यामुळे मागील काही एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडने सहज ३०० धावा उभारल्या आहेत. बेन स्टोक्स सारखा प्रतिभावंत अष्ठपैलू खेळाडू इंग्लंडच्या संघात आहेच पण त्या बरोबर मोईन आली आणि क्रिस वोक्स देखील आहेत.

बांगलादेश पूर्णपणे त्याच्या गोलंदाजीवर वलंबून असणार आहे. शाकिब उल हसन, तस्कीन अहमद आणि बांग्लादेशचा उभारता तारा मुस्ताफिझूर रहमान या गोलंदाजांकडून बांग्लादेशला अपेक्षा असतील. मागील काही वर्षातील चांगल्या कामगिरीचं श्रेय ही या खेळाडूंनाच जाते.

खेळपट्टीचा बद्दल

ओवलचे मैदान बहुदातरी फलंदाजीसाठी अनुकूल असते, पण मागील चार वर्षात या मैदानावर एकही एकदिवसीय सामना झालेला नाही. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी २१३ एवढी आहे. पाऊस पडण्याची शक्यता तशी तरी कमी आहे, पण वातवरण मात्र ढगाळ राहणार हे नक्की.
मागील ५ सामन्यातील कामगिरी

इंग्लंड – हार, विजय, विजय, विजय, विजय.

बांग्लादेश – विजय, विजय, हार, हार, विजय.

संभाव्य संघ

इंग्लंड – जेसन रॉय, अॅलेक्स हेल्स, जॉव रूट, ईऑन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, आदिल रशीद, लिअम प्लंकेट,मार्क वूड.

बांग्लादेश – तमिन इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुशफिकूर रहीम, महमदुल्लाह, साकिब अल्हासन, मोसादडेक होसाईन, मेहंदी हसन, मुस्तफी मोर्ताझा, रुबेल हसन, मुस्ताफिझूर रहमान.