पहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात आजपासून (1 आॅगस्ट) सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे.

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने पहिल्या डावात नवव्या षचकात त्रिफळाचित केले आहे. कूकने 28 चेंडूत 13 धावा करताना 2 चौकार मारले.

अश्विनने कूकला आठव्यांदा कसोटीत बाद केले आहे. यामुळे अश्विन हा आता कूकला कसोटीत सर्वाधिकवेळा बाद करणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यात त्याने आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लायनची बरोबरी केली आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचाच रविंद्र जडेजा आहे. त्याने कूकला आत्तापर्यंत 7 वेळा बाद केले आहे. मात्र या सामन्यासाठी त्याला भारताच्या 11 जणांच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.

कूक बाद झाल्याने इंग्लंडकडून तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार जो रुट फलंदाजीसाठी आला आहे. इंग्लंडने 13 षटकात 1 बाद 45 धावा केल्या आहेत.

हा सामना एजबॅस्टन मैदानावर होत असून इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पहा व्हिडीओ- या गोलंदाजाने टाकला जगातील सर्वात खराब चेंडू

टीम इंडीयाच्या या गोलंदाजाने दिली अॅलिस्टर कूक बाद करण्याची आयडीया

पहिल्या कसोटी सामन्यात या संघाने जिंकली नाणेफेक, अशी आहे टीम इंडिया