जो रूटने केले हे विक्रम

डू प्लेससीसच्या अनुपस्थितीत डीन एल्गार तर इंग्लंड तर्फे जो रूटने आपले कसोटी कर्णधार म्हणून काल पदार्पण केले. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकत जो रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण १४/१, १७/२, ४९/३ आणि ७६/४ अशी इंग्लंडची अवस्था पहिल्या सत्रात झाल्यावर कर्णधार जो रूटने एका बाजूने किल्ला लढवत सुरेख फलंदाजीचे प्रदर्शन केले, तसेच नशिबाची साथ घेत १९० धावा ठोकल्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४५८ धावांचा डोंगर उभा केला.

 

या खेळीतील काही महत्वाच्या नोंदी:

#१ ५४ सामने व ९९ डावात जो रूटचे कारकिर्दीतले १२वे शतक.
#२ इंग्लंडमध्ये ९वे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २रे शतक.
#३ लॉर्ड्सवरचे ३रे शतक. लॉर्ड्सवर २ द्विशतके झळकावणारा पहिला फलंदाज होण्यापासून केवळ १० धावा कमी पडल्या.
#४ लॉर्ड्स मैदानावर १००० धावा पूर्ण. असे करणारा ९वा इंग्लिश फलंदाज, त्या सर्वात वेगवान. केवळ १७ डावात सहस्त्र धावा.
#५ कर्णधार पदार्पणात शतक झळकावणारा ६वा इंग्लिश कर्णधार. याआधी कूक, पीटरसन, स्ट्रॉस यांनी ही शतके काढली होती.
#६ कर्णधार पदार्पणातील डावात इंग्लंड तर्फे सर्वोच्च धावा.
#७ फॅब फोरमधील विराट कोहली व स्टीवन स्मिथ या दोघांनींही कर्णधार पदार्पणात शतक झळकावले होते, तर केन विलियम्सन याने ९१ धावा केल्या होत्या.
#८ रूटचा आपल्या १२ शतकात ६वी १५०+ ची खेळी. व्हॉन, ट्रेस्कॉथिक, ग्रेव्हनी आणि हॉब्सची बरोबरी.

 

ओंकार मानकामे – (टीम महा स्पोर्ट्स)