इंग्लंडने जिंकला चौथ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषक

यजमान इंग्लंड संघाने भारतीय महिला संघाला आयसीसी महिला विश्वचषक एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ९ धावांनी पराभूत करत विश्वचषक जिंकला. हा इंग्लडचा चौथा महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

१९७३, १९९३ आणि २००९ साली यापूर्वी इंग्लंड संघाने विश्वचषक जिंकला आहे.

इंग्लंड संघाने निर्धारित ५० षटकांत २२९ धावांच लक्ष भारतीय संघासमोर ठेवलं होत परंतु संपूर्ण भारतीय महिला संघ २१९ धावांवर बाद झाला.