अंबाती रायडूच्या 3D ट्विटबद्दल एमएसके प्रसाद यांनी दिले असे उत्तर

आज(21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यासाठी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर केला आहे. भारतीय संघाची घोषणा करताना निवड समीती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी अंबाती रायडूच्या थ्री डी(3D) ट्विटबद्दलही आपले मत मांडले आहे.

2019 विश्वचषकासाठी भारतीय संघात रायडू ऐवजी विजय शंकरची निवड करण्यात आली होती. यासाठी शंकर हा त्रिआयामी खेळाडू [थ्री डायमेंशन खेळाडू(3D)] असल्याचे कारण दिले होते. त्यामुळे 3D या शब्दाचा वापर करत रायडूने निवड समीतीवर निशाणा साधला होता. त्याने ट्विट केले होते की ‘विश्वचषक बघण्यासाठी 3डी (3D) चश्म्याचा एक सेट आत्ताच ऑर्डर केला आहे.’

याबद्दल प्रसाद म्हणाले, ‘खरं तर हे खूप मस्त ट्विट होते. खरंच ते योग्य वेळेवर केलेले ट्विट होते. मला माहित नाही त्याच्या डोक्यात ही गोष्ट कशी आली, पण मी त्याचा आनंद घेतला.’

त्याचबरोबर रायडूला विश्वचषकादरम्यान भारताचे शिखर धवन आणि शंकर हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतरही संधी दिली गेली नाही.

याबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले, ‘एखाद्याच्या जशा भावना असतात तशाच निवड समीतीच्याही असतात. जेव्हा आम्ही एखाद्या खेळाडूची निवड करतो आणि तो खेळाडू चांगली कामगिरी करतो, तेव्हा आम्हाला आनंद होतो.’

‘जेव्हा एखाद्या खेळाडूची निवड होत नाही, तेव्हा त्याच्याबद्दल निवड समीतीला वाईटही वाटते. पण जे निर्णय घेतले गेले ते पक्षपाती नव्हते. सुरुवातीपासून आम्ही विजय शंकर, रिषभ पंत आणि मयंक अगरवालला संधी देण्याची कारणे दिली आहे. ही गोष्ट रायडूबाबतही आहे.’

तसेच ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा रायडूची टी20 च्या कामगिरीवरुन वनडेसाठी निवड करण्यात आली होती तेव्हाही टीका झाली होती. पण आम्ही त्याच्याबद्दल काही विचार केला होता. जेव्हा तो फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला तेव्हा या निवड समीतीने त्याला पाठिंबा दिला आणि त्याला भारतीय संघासाठी फिट होण्यासाठी फिटनेस प्रोग्राममध्ये सामील करण्यात आले.’

‘पण काही विशिष्ट संयोजनामुळे, त्याची निवड करण्यात आली नाही. पण यामुळे निवड समीती पक्षपाती होत नाही.’

रायडूने 3 जूलैला बीसीसीआयला मेल करुन सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याच्या निवृत्तीमागील कारण त्याने स्पष्ट केलेले नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

एमएस धोनीबद्दल एमएसके प्रसाद यांनी केले मोठे भाष्य

या क्रिकेटपटूला टीम इंडियात संधी मिळता मिळता राहिली; एमएसके प्रसाद यांनी केला खूलासा

विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी