विश्वचषक २०१९: या कारणामुळे इंग्लंडच्या कर्णधाराला मुकावे लागले पहिल्या सराव सामन्याला

2019 विश्वचषकाला इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने 30 मेपासून सुरुवात होणार आहे. पण या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सर्व संघ प्रत्येकी 2 सराव सामने खेळणार आहे. यातील इंग्लंडचा पहिला सराव सामना आज(25 मे) ऑस्ट्रेलिया विरुद्ध होत आहे.

परंतू या सामन्याआधीच इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनला डाव्या हात्याच्या तर्जनीला फ्रॅक्चर झाले आहे. त्याला काल(24 मे) साऊथँम्पटन येथे नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना ही दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला वेदना होत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्या बोटाचा एक्स-रे काढण्यात आला. यामध्ये त्याला छोटे फ्रॅक्टर झाल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे तो आज ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध नाही. या सराव सामन्यात त्याच्याऐवजी जॉस बटलर इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे.

पण त्याचबरोबर 30 मे ला होणाऱ्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यापर्यंत तो पूर्ण बरा होईल अशी आशा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याच्या दुखापतीबद्दल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की ‘तो सराव सामन्यात सहभागी होणार नाही. पण तो आयसीसी क्रिकेट विश्वचषकात द ओव्हलवर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी पूर्णपणे बरा होणे आणि या सामन्यासाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे.’

असे असले तरी त्याची 27 मे ला अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या इंग्लंडच्या दुसऱ्या सराव सामन्यातील उपलब्धतेबद्दल मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

त्याचबरोबर आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मॉर्गननेही सांगितले आहे की त्याच्या बोटाचे हे फ्रॅक्चर छोटे आहे. तसेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापर्यंत फिट होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: एकाच दिवसात हे चार खेळाडू झाले दुखापतग्रस्त

इंग्लंडच्या माजी कर्णधाराला अजूनही वाटते या दोन भारतीय क्रिकेटपटूंची भीती…

विश्वचषक २०१९: टीम इंडियाला धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू झाला दुखापग्रस्त