एसएसएफआयच्या सिद्धांत खोपडेची फिसेक गेम्समध्ये चमकदार कामगिरी

दोन सुवर्ण, एक रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई : बेल्जियममधील गेन्क येथे स्पर्धा संपन्न

पुणे । गेन्क (बेल्जियम) येथे पार पडलेल्या ७० व्या फिसेक – फायसेप गेम्स २०१८ मध्ये स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडियाच्या फुटबॉल(मुले), व्हॉलीबॉल (मुली) आणि स्विमिंग (मुले) संघानी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडिया संघाचा जलतरणपटू सिद्धांत खोपडे याने उत्कृष्ट कामगिरी करत, दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्य पदक पटकावले,अशी माहिती स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी दिली.

सिद्धांत खोपडे याने ५० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण पदक, २०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक, आणि १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेत मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने सहभाग घेतला होता. पुण्याच्या व्हॉलीबॉल चँपियन मिलेनियम स्कूलच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्कूल स्पोर्टस फेडरेशन आॅफ इंडिया संघाने बाद फेरीत स्पेनचा पराभव करत स्पर्धेत ६ वे स्थान प्राप्त केले तर मुलांच्या फुटबॉल संघाला ८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

एकूण १८ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेचे आयोजन फ्लेमिश स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने फेडरेशन दी इंटरनेशनल कॅथलिक स्कूल स्पोर्ट्सच्या (फिसेक) अधिपत्याखाली करण्यात आले होते. फिसेक हि इंटरनॅशनल आॅलिंपिक समितीअंतर्गत मान्यताप्राप्त संघटना आहे.

विठ्ठल शिरगावकर म्हणाले, फिसेक गेम्स हे शालेय खेळाडूंसाठी आॅलिंपिक खेळाच्या तयारीसाठी उत्तम व्यासपीठ असून, येथे आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेच्या दृष्टीने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कुठे गेला तुमचा कोहली?

-दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून स्टार खेळाडूला वगळले

-श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी