वाचा लॉर्ड्सवर उपस्थित असणारा अक्षय कुमार काय म्हणाला महिला संघाबद्दल ?

काल लॉर्ड्स मैदानावर पार पडलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने ९ धावांनी भारताचा पराभव केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय महिला खेळाडूंच्या चमूत नाराजगी पसरली होती.

या संघाला पाठिंबा देण्यासाठी बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार खास लॉर्ड्स मैदानावर उपस्थित होता. सामना सुरु असताना आणि सुरु होण्यापूर्वी अक्षयने भारतीय संघाला खास शुभेच्छा देणारा विडिओ आणि छायाचित्र प्रसिद्ध केले होते.

सामना संपल्यावर काही वेळाने अक्षयने खास मैदानावर जाऊन भारतीय खेळाडूंबरोबर चर्चा केली. त्यात अक्षय म्हणतो, ” तुटलेली ह्रदये सुद्धा हसू शकतात. या महिलांनी भारतीय महिला क्रिकेटमध्ये क्रांती सुरु केली आहे. यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही. ”