आधी नक्षलवादी असलेल्या महिलेची मुलगी खेळणार भारताकडून…

 

नक्षलवाद सोडलेल्या एका महिलेची १५ वर्षीय मुलगी चीन येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे. ओडिसा येथील मालकानगिरी जिल्ह्यातील शिरिसा ही पूर्वी नक्षलवादी असलेल्या चेलम्मा करामी महिलेची १५ वर्षीय मुलगी आहे.

शिरिसाची ही अंडर १८ वयोगटाच्या भारतीय संघात निवड झाली आहे.

एप्रिल महिन्यात एर्नाकुलम, केरळ येथे झालेल्या जुनिअर राष्ट्रीय कॅम्पमध्ये तिने केलेल्या जबरदस्त कामगिरीची दाखल घेत तिला संघात स्थान देण्यात आले आहे.

द हिंदू या वृत्तपत्राशी बोलताना ती म्हणाली, ” याच सर्व श्रेय आईला जाते. मला माझे वडील जास्त आठवत नाहीत. मी वर्षात कधीतरी त्यांना पाहत असे. माझ्या आईने मला आणि बहिणीला खऱ्या अर्थाने वाढवले. मोठे केले. ”

 

PC: The Hindu

एकवेळ ओरिसा आणि आंध्रप्रदेशात चेलम्मा करामी ही एक मोस्ट वॉन्टेड नाक्षवादी होती. १९९० साली नक्षलवादी विचारांनी प्रभावित होऊन टी नाक्षवादी संघटनेत सामील झाली होती. तिची प्रचंड दहशत या भागात होती. १९९४ साली ती पोलिसांना शरण आली. त्यांनतर तिला २००० पर्यंत ६ वर्षांचा कारावासही झाला. कारागृहातून मुक्त झाल्यांनतर तिने मुलींच्या सरकारी हायस्कुल मध्ये आचारी म्हणून काम केले. स्वतःच्या मुलींना योग्य शिक्षण देणे हेच उद्धिष्ट तिने ठेवले होते.

आज तिच्या या कष्टांना फळ मिळाले आहे. तिची मुलगी शिरिसा ही खेळाबरोबरच शिक्षणातही प्रगती करत आहे.

ह्या वर्षी शिरिसाने दहावीच्या परीक्षेत ७३.% मिळविले आहे.

ती मुलींच्या सरकारी हायस्कुलमध्ये कलिमेला येथे शिक्षण घेत आहे. जिल्हास्तरावर तिने आजपर्यंत १० पेक्षा जास्त पदक जिंकली आहेत.