रोहित शर्मा एशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास उत्सुक

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या 14 व्या एशिया कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँग काँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने प्रभारी कर्णधार रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

ही नेतृत्वाची जबाबदारी मोठी आहे. तसेच भारताचे नेतृत्व करण्यासाठी उत्साही असल्याचे रोहित शर्माने सांगितले आहे. रोहित हाँगकाँग विरुद्धच्या सामन्याआधी बोलत होता.

तो म्हणाला, “ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. मी याआधी भारतीय संघाचे नेतृतेव केले आहे. माझ्यासाठी ही मोठी स्पर्धा आहे. मी थोडा नर्व्हस आहे, पण त्याचबरोबर एशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व करण्यास उत्सुकही आहे.”

“मी या खेळाडूंबरोबर भरपूर खेळलो आहे आणि त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी मला माहित आहे. या आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे.”

भारतीय संघ एशिया कपमधील पहिले दोन्ही सामने दुबईला होणार आहेत. त्याबद्दल रोहित म्हणाला, “आम्ही इथे खेळलेलो नाही. मागच्यावेऴी 2014 मध्ये आयपीएल दरम्यान अनेक क्रिकेटपटू इथे खेळले आहेत.”

“या ठिकाणी (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) खेळून खूप वर्षे झाली आहेत. खेळपट्टी, मैदान आणि त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी उद्या आमच्याकडे खूप चांगली संधी आहे. हे सर्व समजणेआणि त्याचा खेळात उपयोग करणे खूप महत्त्वाचे आहे.”

भारतीय संघाला सध्या मधल्या फळीचा प्रश्न भेडसावत आहे. भारताकडे यासाठी केदार जाधव, अंबाती रायडू, मनिष पांडे, एमएस धोनी आणि केएल राहुल असे पर्याय आहेत. तसेच 2019 च्या विश्वचषकाच्या दृष्टीनेही भारताला मधल्या फळीतील फलंदाजीचा प्रश्न सोडवावा लागणार आहे.

याबद्दल रोहित म्हणाला, ” प्रत्येकाला जागा हवी आहे. कोणालाही संघातून वगळून परत घेणे पसंत नाही.”

“3,4 आणि 5 व्या क्रमांकासाठी अनेक पर्याय आहेत. हे सर्व खेळाडूंना त्या जागा हव्या आहेत. आम्हाला या स्पर्धेसाठी संघबांधणीचे योग्य मिश्रण पहावे लागेल. आम्हाला शक्य होईल त्या जास्तीत जास्त खेळाडूंना संधी द्यायची आहे. ज्यामुळे 4 आणि 6 स्थान पक्के होईल.”

“या जागांवर अनेक खेळाडू खेळले आहेत आणि पुढे जाताना आम्हाला सर्वकाही योग्य हवे आहे. या स्पर्धेने खेळाडूंना क्रिकेट खेळून त्यांची जागा पक्की करण्याची संधी दिली आहे. पण मी असे म्हणत नाही की ही एक चिंता आहे.

याबरोबरच भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळालेला डावकरी वेगवान गोलंदाज खलील अहमदबद्दल रोहित म्हणाला, “त्याने संघात विविधता आणली आहे. तसेच त्याच्याकडे चांगला वेगही आहे. तो युवा, प्रतिभाशाली आहे. तसेच तो चेंडू स्विंगही करु शकतो. मला त्याला खेळताना आणि देशासाठी चांगले करताना पहायचे आहे.”

याबरोबरच त्याच्या गोलंदाजीबद्दल रोहितने विश्वासही दर्शवला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस

दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी राजीनामा देत आहे – विरेंद्र सेहवाग