रियल मॅद्रिद विरुद्ध लीवरपुल रंगणार युसीएलचा अंतिम सामना

रोम। युसीएलमध्ये रियल माद्रिद विरूध्द लीवरपुल असा एेतिहासिक अंतिम सामना होणार आहे. हा सामना 26 मे (भारतीय वेळेनुसार 27 मे)ला काईवमध्ये होणार आहे.

लीवरपुलने या स्पर्धेत 40 गोल तर माद्रदिने 30 गोल केले आहेत.

युसीएलचे गतविजेते आणि 12 वेळा जिंकणारे माद्रिद त्यांच्या सलग तिसऱ्या चषकासाठी तर लिव्हरपूल एेतिहासिक सहावे विजेतेपद जिंकण्यास उत्सुक आहेत.

या स्पर्धेत जास्त गोल नोंदवण्यामध्ये या दोन संघातील तीन खेळाडूंचा पहिल्या चार स्थानांमध्ये समावेश आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो 15 गोलसह पहिल्या स्थानावर तर मोहामेद सलाह (11) आणि रोबेर्तो फरमिनो (11) गोलसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर आहे.

तर सादिओ मॅने हा 9 गोलसह पाचव्या स्थानावर आहे. रोमविरूध्दच्या उपांत्य फेरीत त्याने पहिला गोल केला होता. हा सामना लिव्हरपूलने 7-6 असा जिंकला होता.

जर हे विजेतेपद लीवरपुलने जिंकले तर ते बार्सिलोना आणि बायेर्न म्युनिचच्या पुढे जातील. सर्वाधिक विजेतेपद मिळवलेल्या क्लबच्या यादीत त्यांचे काईवमधील प्रतिस्पर्धी सात वेळेचे विजेते एसी मिलन त्यांच्या एक स्थान पुढे आहे.

रियलने 1960 ला ऐन्त्राच्त फ्रॅन्कफूर्टवर 7-3 असा मिळवलेला विजय हा कायम लक्षात राहील आणि तो कधीही इतिहासातून पुसला जाणार नाही. आत्ताच्या संघात पण तसे खेळाडू, प्रशिक्षक असल्याने परत 1960च्या सामन्याची पुनरावृत्ती होऊ शकते.

तसेच 1981 मध्ये झालेल्या सामन्यासरखा हा सामना होऊ शकतो. हा सामना लीवरपुलने 1-0 ने जिंकला होता. हा गोल अॅलन केनेडीने केला होता.

रियलचा खेळ पण पहिल्यासारखा राहिला नाही. 2016 आणि 2017 ला झालेल्या अॅटलेटिको माद्रिद आणि ज्युवेनतुस यांच्या विरूध्दच्या अंतिम सामन्यात त्यांना खूप कष्ट करावे लागले होते.

त्यांची कमजोरी ज्युवेनतुस विरूध्द झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात आणि बायेर्न विरूध्द झालेल्या उपांत्य सामन्यात दिसून आली. बायेर्न विरूध्द तो सामना दुसऱ्या लेगमध्ये 2-2 असा ड्रॉ झाला होता.

गॅरेथ बाले याने व्यवस्थापक झिनेडाईन झिडाने यांचा विश्वास गमावला आहे. गोलकिपर कीलोर नवास याच्याकडून पण चुका होत आहेत. तसेच सरगिओ रामोस आणि रोनाल्डो हे दोघेपण त्यांचा नैसर्गिक खेळ खेळत नाही.

लीवरपुल विरूध्दच्या सामन्यात ईस्को, मार्को असेनसिओ आणि करिम बेनझेमा यांनी रोनाल्डोला योग्य साथ दिली तर ते लीवरपुलच्या बचावफळीचा चांगला सामना करू शकतात.

तर जुरगेन क्लोपच्या अंतर्गत असलेली लीवरपुलची बचावफळी सलाह, फिरमीनो आणि मॅने हे रियलच्या बचावफळीचा फायदा घेऊ शकतात. या तिघांनी या मोसमात 29 थ्री प्रोन्गड स्ट्राईक फोर्स करून 2013-14 मधील रोनाल्डो, बेनझेमा आणि बाले यांच्या 28 थ्री प्रोन्गड स्ट्राईक फोर्सला मागे टाकले आहे.

दोन्ही संघाची ताकद आणि कमजोरी सारखीच आहे. मात्र रियलची मधली फळी वरचढ आहे. यामध्ये कॅसेमिरो, टोनी क्रुस, मटेओ कोवासिस आणि ल्युका मोड्रिक हे खेळाडू आहेत.

जॉर्डन हेंडरसन, जॉरजिनीओ विजनाल्डम आणि जेम्स मिलनेर यांच्याकडे शक्ती, दृढता आहे तर रियलच्या खेळांडूकडे सामन्यात वर्चस्व राखण्याचे सामर्थ्य आहे.
रियलचा संघ या सामन्याचा धक्कादायक निकाल लावू शकतात, पण लिव्हरपूलचा संघही त्यांना तेवढीच टक्कर देऊ शकते.
यावरूनच एकंदरीत हा सामना खूप अटीतटीचा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –

पहा व्हिडीवो- बर्थडेचं यापेक्षा चांगले सरप्राईज असुच शकत नाही!

कोहलीपेक्षा मी लांब षटकार मारतो, मग कशाला कमी खायचं!

अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळणार आहे, विराट कोहली विरुद्ध नाही

बेंगलोर चाहत्यांसाठी गुड न्युज, सीएसकेची धुलाई करण्यासाठी हा खेळाडू सज्ज

सगळ्यांनी माघार घेतली असताना हा देश करणार पाकिस्तानचा दौरा?