एबी डिव्हिलियर्सच्या पुनरागमानाबद्दलच हे आहे मोठे वृत्त

केपटाऊन | आॅस्ट्रेलिया दौऱ्यावरुन आल्यानंतर केपटाऊन विमानतळावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीने एबी डिव्हिलियर्सच्या पुनरागमनावर मोठ भाष्य केलं आहे.

“मला आजकाल एबीवर खूप प्रश्न विचारले जात नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. तरी मी आज एका प्रश्नावर उत्तर देऊ शकतो. ” असे यावेळी फाफ म्हणाला.

यावर पत्रकारांनी लगेच तो कधी पुनरागमन करणार, तसेच त्याचे संघात स्वागत केलं जाईल का? असा प्रश्न केला.

“एबीची तशी इच्छा असायला हवी. निवृत्ती घेण्याचा निर्णय त्याने घेतला होता. त्यामुळे तो बदलण्याचा निर्णय देखील त्याचाच असेल. पाकिस्तान मालिकेपुर्वी आम्हाला आमचा सर्वात्तम संघ निवडावा लागेल.  त्यामुळे त्याचा निर्णय काय असेल ते जानेवारीपर्यंत समजले तर त्याबद्दल पाकिस्तान मालिकेत विचार होऊ शकतो.” असेही यावेळी फाफ म्हणाला.

“एबी एक जगातील नावाजलेला क्रिकेटर आहे. त्याला जर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर तो त्याचा निर्णय असेल. परंतु यासाठी संवाद साधणे महत्त्वाच आहे.”

एबी डिव्हिलियर्सने मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

Breaking- पहिल्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या १२ खेळाडूंच्या नावाची घोषणा

वाढदिवस विशेष- कबड्डीतला धोनी: अनुप कुमार

तर आणि तरच टीम कोहलीकडून होणार तगडा विक्रम...

आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या हिटमॅन रोहित शर्माची अस्सल मराठी प्रतिक्रिया

महिला टी२० विश्वचषकच्या अशा होणार सेमीफायनल