ह्या फोटोबद्दल आहे कागिसो रबाडाच्या गर्लफ्रेंडला तक्रार

केप टाउन । काल आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा अव्वल स्थानी विराजमान झाला. रबाडा या स्थानावर विराजमान होणार दक्षिण आफ्रिकेचा केवळ ७वा गोलंदाज आहे.

यामुळे साहजिकच या २२ वर्षीय खेळाडूवर जोरदार कौतुकाचा वर्षाव होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीने रबाडाचे कौतूक केले आहे. तसेच एक खास इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात फाफ म्हणतो, ” तुम्ही जेव्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होता तेव्हा तुम्हा ही गोष्ट मिळते. तू मोठी कामगिरी केली आहेस. तू चॅम्पियन्स आहेस. “

यावर रबाडाने खास कंमेंट करत म्हटले आहे, ” परंतु माझ्या गर्लफ्रेंडची या फोटोबद्दल तक्रार आहे. “

कागिसो रबडा मंगळवारी जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्याने इंग्लडच्या जेम्स अँडरसन या दिग्गज गोलंदाजाला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.

कागिसोने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात ५ गुणांची कमाई केली. याचमुळे त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

नोव्हेंबर २०१५ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कागिसोने केवळ २ वर्षांतच ही कामगिरी केली आहे. गेल्यावर्षी हा खेळाडू वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता.

आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा कागिसो रबाडा हा केवळ ७वा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. यापूर्वी ऑब्रे फॉकनर, हँग टायफाइल्ड, पीटर पोलॉक, शॉन पोलॉक, डेल स्टेन आणि व्हर्नोन फिलँडर यांनी ही कामगिरी केली होती.