सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा

अष्टपैलू भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या निधनाची सर्व वृत्त खोटी असल्याचे खुद्द रैनानेच ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

सुरेश रैनाचा एका अपघातात मृत्यु झाल्याचे व्हीडिओ अनेक युट्युब चॅनेल्सवर गेल्या २-३ दिवसांपासून व्हायरल होत होते. यामुळे वैतागलेल्या रैनाने आज या माध्यमांवरील असे वृत्त देणाऱ्यांना समज दिला आहे.

“गेल्या काही दिवसांपासून माझ्या अपघाती निधनाचे वृत्त येत आहे. माझा कार अपघातात मृत्यु झाल्याचे त्यात सांगितले जात आहे. यामुळे माझा मित्र परिवार तसेच कुटूंबियांना याचा त्रास होत आहे. चाहत्यांनी अशा कोणत्याही वृत्तांकडे लक्ष देऊ नये. मी पुर्णपणे ठिक आहे. असे वृत्त देणाऱ्या युट्युब चॅनेल्सची मी तक्रार केली आहे आणि त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल.” असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Photo Courtesy: Twitter/ BCCI

महत्त्वाच्या बातम्या- 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय

अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली

मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने

असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ

हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?