सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी दिल्या सचिनच्या चित्रपटाला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा!

सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक हे नेहमीच देशात सुरु असणाऱ्या घडामोडींबद्दल आपल्या वाळूशिल्पातून भाष्य करत असतात. वेळोवेळी त्यांनी आपल्या शिल्पातून क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांना मानवंदनाही दिली आहे. जेव्हा भारतीय संघ भुवनेश्वर येथे एकदिवसीय सामना खेळायला गेला तेव्हा म्हणा किंवा अगदी अलीकडे दंगल सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा त्यांनी या विषयावर वाळूशिल्प बनवले होते.

जगातील सर्वात उंच वाळूशिल्प बनविल्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या पटनायक यांनी आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सचिन अ बिलियन ड्रीम चित्रपटावर एक सुंदर वाळूशिल्प बनविले आहे. त्याचा त्यांनीही ट्विटसुद्धा केला असून त्यात सेहवाग, आयसीसी, रैना, पंतप्रधान मोदी, क्रीडामंत्री विजय गोयल आणि महानायक अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे, “सचिन तू आधीच करोडो हृदय जिकली आहेत. माझ्याकडून तुला तुझ्या चित्रपटासाठी शुभेच्छा! ”

हे वाळूशिल्प चेन्नई येथील समुद्रकिनाऱ्यावर काढण्यात आले आहे.