चाहत्याकडून विराटला थेट मैदानातच मिठी मारण्याचा प्रयत्न, पहा व्हिडीओ

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. परंतु हेच चाहते कधीकधी जास्तच भावनिक होतात. त्यावेळी खेळाडूंसह सुरक्षा रक्षकांची भांबेरी उडते.

भारत आणि विंडिज यांच्यातला दूसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान असाच काहीसा प्रकार घडला. सामना सुरू झाल्यानंतर साधरणत: एक तासाने चाहत्याने बॅरिकेडवरून उडी मारून मैदानात कोहलीकडे जोरात धावत सुटला.

कोहलीला जोरात मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने कोहली सोबत सेल्फीही काढला. नंतर सुरक्षा रक्षांनी या चाहत्याला मैदानाबाहेर नेले.

कोहलीसोबत असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. राजकोट येथे विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन चाहत्यांनी अशाच प्रकारे मैदानात जाऊन विराट सोबत सेल्फी काढला होता.

मैदानावर जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा विंडिजने 40 धावात एक फलंदाज गमावला होता. सामन्यात आलेल्या या व्यत्ययाचा फायदा घेत मैदानातील पंचानी  ड्रिंक्स ब्रेक घेतला.

महत्वाच्या बातम्या-