पहा इंग्लंडच्या चाहत्यांचा क्रिकेटच्या मैदानातील तो व्हायरल विडिओ!

विंडीज विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना इंग्लंडने डावाने जिंकला. सामना जरी रोमहर्षक झाला नसला तरी इंग्लंडमधील प्रेक्षक वर्गाने तो मनोरंजक केला. तो इतका मनोरंजक केला की इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही हसू लपवता आले नाही.

विंडीज संघ फॉल्लो-ऑन नंतर दुसऱ्यांदा फलंदाजी करत होते. तिसऱ्या षटकातील ४ चेंडू झाल्यावर एक मोठा बॉल सीमारेषेवर पडला. जो की प्रेक्षक त्यांच्या स्टॅन्डमध्ये खेळत होते. तो परत मिळावा म्हणून प्रेक्षकांनी तिथे असलेल्या गार्डला आवाज द्यायला सुरुवात केली. ते प्रतिसाद देत नसल्याने दुसऱ्या बाजूला बसलेले प्रेक्षकही त्यात सामील झाले.

अनेक रंगीबेरंगी पोशाख घातलेले प्रेक्षक एकाच जागी जमा होऊन बॉल देण्यासाठी मोठमोठ्याने आवाज देऊ लागले. यामुळे शेवटी त्या गार्डला चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बॉल परत द्यावा लागला. हा सर्व प्रकार पाहून इंग्लंडचा कर्णधार जो रूट, अॅलिस्टर कूक , अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि अन्य खेळाडू यांना मात्र हसू आवरता आले नाही.

पहा हा संपूर्ण विडिओ: