संघाबाहेर असलेल्या अश्विनच्या चाहत्यांनी काल चेन्नई सामन्यापूर्वी काय केले ? पहा संपूर्ण विडिओ !

चेन्नई । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारताचा आर अश्विन याला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या हा खेळाडू इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. अश्विनला संघात न घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निवड समितीला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

काल आर अश्विनचा वाढदिवस होता. विशेष म्हणजे कालचा सामना देखील अश्विनचे होम ग्राउंड चेपॉक, चेन्नई येथे होता. जर कालच्या सामन्यात अश्विनला खेळायला मिळाले असते तर नक्कीच वाढदिवसाच्या दिवशी घराच्या मैदानावर खेळणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला असता. यापूर्वी सुरेश रैना वाढदिवसाच्या दिवशी आपल्या होम ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

या कारणामुळे चाहत्यांनी मात्र नाराज न होता अश्विनला खास मैदानावर आणि मैदानाबाहेर शुभेच्छा दिल्या. ‘अश्विन आर्मी’तील एका चाहत्याने त्याचा खास विडिओ शेअर केला आहे. त्या विडिओमध्ये चाहते म्हणतात, “वाढदिवसाच्या शुभेच्छा अश्विन. आम्हाला चेपॉकवर तुझी कमतरता जाणवत आहे. परंतु इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तुला त्याचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल. चांगली कामगिरी करत राहा तुला शुभेच्छा. ”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना २१ सप्टेंबर रोजी इडन गार्डन कोलकाता येथे होत आहे.