आणि ५१ मिनिटांचं सचिनच्या ध्यानात आली आपली चूक

तिरुवनंतपुरम । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील निवृत्तीनंतर अनेक सामाजिक कार्यात भाग घेतो. मग स्वच्छ भारत मिशन असो किंवा वाहतूक जनजागृती.

परंतु काल सचिनकडूनच मोठी चूक झाली आणि त्याला मोठ्या टीकेला ट्विटरवर सामोरे जावे लागले. तिरुवनंतपुरम जेव्हा सचिन आपल्या कारने जात होता तेव्हा त्याला काही दुचाकीस्वार गादीवर हेल्मेट न घालता जाताना दिसले.

त्यातील काही गाड्यांवर चालकाने हेल्मेट घातले होते परंतु मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नव्हते. यावर भाष्य करताना सचिनने दुचाकीवर पुढे आणि मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट घालावे. कारण पुढच्याला दुखापत होऊ शकते मग मागच्याला का नाही असे म्हटले.

याचा विडिओ सचिनने आपल्या ट्विटरवर शेअर केला. परंतु हे करताना मागच्या सीटवर बसलेल्या सचिनने स्वतःच सीटबेल्ट घातला नव्हता. यामुळे नेटिझन्सच्या मोठ्या टीकेला त्याला सामोरे जावे लागले.

 

आपली चूक लक्षात आल्यावर सचिनने तात्काळ दुसरा फोटो शेअर करून आपल्या चुकीत सुधारणा केली. यात सचिनने मागच्याच सीटवर सीटबेल्ट घालून पुन्हा फोटो शेअर केला.

हा फोटो बेंगलोर पोलीस आणि मुंबई पोलिसांनी शेअर केला.

 

मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाउंट हे आज संपूर्ण भारतात त्याच्या खास अंदाजासाठी आणि उत्तरांसाठी प्रसिद्ध आहे. यावेळीही सचिनच्या ट्विटवर ‘हा सचिनचा कदाचित आजपर्यंतचा सर्वात चांगला शॉट असेल’ असे त्यांनी म्हटले.